समृद्ध कोकणच्यावतीने रत्नागिरी जिल्ह्यात शंभर गावात होमस्टे उभारणार
पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या समृद्ध कोकण या संस्थेच्यावतीने रत्नागिरी जिल्ह्यातील शंभर गावात होमस्टे उभे करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जात आहेत.समृद्ध कोकण संस्थेचे अध्यक्ष संतोष गांगणयांनी हा महत्त्वाकांक्षी होमस्टे प्रकल्प राबवण्याची योजना पुढे आणली आहे. त्या होम स्टे मुळे पर्यटकांना सुविधा उपलब्ध होतीलच याबरोबर गावातील महिला व बचत गटांना काम मिळाल्यामुळे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर रोजगार निर्माण होईल. कोकणची संस्कृती परंपरा येथे असलेले सुंदर समुद्र किनारे व उत्सव आदींची माहिती यामुळे पर्यटकांना होईल व पर्यटकांचा येथे ओघ वाढू शकेल यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करणेत येणार आहे.
www.konkantoday.com