
मालकाच्या संमतीशिवाय बनावट धनादेश वटविण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी शहरातील माळनाका येथील सिटी हार्ट मिनी मॉलमधील कर्मचाऱ्यांने कंपनीच्या खात्यातील १लाख ६५हजार रुपयाची रक्कम बनावट धनादेश तयार करून काढण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मॉलचे मालक मुस्तकीन साखरकर यांनी रत्नागिरी पोलीस स्थानकात केली आहे.पोलिसांनी मॉलचा कर्मचारी रफिक दोस्ती राहणार कोकणनगर यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.या सिटी मॉलमध्ये दोस्ती हा काम करीत असताना त्याने मॉलमधील टेबलचे ड्रॉव्हर बनावट चावीने उघडून तीन चेक चोरून त्यावर खोट्या सह्या करून वरील रक्कम खात्यातून काढण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार मॉलच्या मालकांनी दिली आहे. मात्र बँकेने मालकाला हा प्रकार कळविल्यावर हा प्रकार उघड झाला.
www.konkantoday.com