गणपतीपुळे येथे विविध कार्यक्रम
रत्नागिरी: प्रतिवर्षाप्रमाणे ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत गणपतीपुळे मंदिरात उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ३१ रोजी सकाळी ९.३० ते ११.३० श्रींची पुजा, प्रसाद २ रोजी दु. ४ ते ६ श्रींची पालखी मिरवणूक व प्रदक्षिणा, ३ रोजी दुपारी ११ ते १२ या वेळेत मोदक समर्पण, ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत दररोज सायंकाळी ७ ते ७.३० वा. आरती याच दिवशी दररोज सायं. ७.३० ते ९.३० वा. भास्करबुवा इंदुलकर यांचे किर्तन, २ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन गणपतीपुळे संस्थानतर्फे करण्यात आले आहे.
www.konkantoday.com