गणेश उत्सवानिमित्त कोकणात जाणार्यांसाठी टोल सवलत
रत्नागिरी: कोकणात जाणार्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय देण्यात येणार आहे. त्यासाठी देण्यात येणारे स्टिकर्स ३० ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहेत. गणेशभक्तांनी जवळच्या पोलीस ठाणे अथवा प्रादेशिक परिवहन कार्यालयात जावून स्टिकर्स घ्यावेत, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत केले.
गणेशभक्तांसाठी टोल माफीच्या निर्णयाबाबत अंमलबजावणी करण्याकरिता शिंदे यांच्या मुंबईतील निवासस्थानी संबंधित अधिकार्यांची बैठक झाली. यावेळी रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सार्वजनिक बांधकाम, पोलीस वाहतूक, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सव काळात कोकणात जाणार्या भाविकांसाठी ही विशेष सवलत गणेशोत्सवासाठी जाताना आणि परतीच्या प्रवासासाठी लागू असणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे टोल सवलतीसाठी स्टिकर्सचा नमुना तयार करण्यात आला असून त्यावर संबंधित वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव आदी माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात, वाहतूक पोलीस चौकी आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये देण्यात यावी. प्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी समन्वय साधून हे स्टिकर्स उपलब्ध करून देतील.
www.konkantoday.com