स्वरूपानंद संस्थेला चौथ्यांदा दीपस्तंभ पुरस्कार
रत्नागिरी येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेला सलग चौथ्यांदा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मार्फत दीपस्तंभ पुरस्कार जाहीर झाला आहे.हा पुरस्कार 31 ऑगस्ट रोजी नागपूर येथे सहकार मंत्री नामदार सुभाष देशमुखांयांच्या हस्ते प्रदान करणेत येणार आहे.स्वामी स्वरूपानंद पतसंस्था ही अॅड. दीपक पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली यशाचे टप्पे गाठत आहे. सध्या पतसंस्थेच्या १७शाखा कार्यरत आहेत.सर्व शाखा नफ्यात आहेत.संस्थेला या आधीही सहकार क्षेत्रातील अनेक पारितोषिके मिळाली आहेत.स्वरूपानंद पतसंस्थेचे काम कोकणात नव्हे तर महाराष्ट्रात आदर्श ठरेल असे आहे.
www.konkantoday.com