जगबुडी पुलाच्या कामांबाबत पालकमंत्री नाराज
मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाच्या कामाबाबत पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी काल प्रत्यक्ष पुलाची पाहणी केली.पुलाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करून नवीन पुलाच्या निकृष्ट कामाबाबत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणारच असे त्यांनी स्पष्ट केले.
येत्या महिन्याभरात या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू केली जाईल असे त्यानी सांगितले पालकमंत्र्यांच्या पाहणीच्या वेळी योगेशदादा कदम, सचिन कदम, जी.प सदस्य चंद्रकांत कदम व अन्य शिवसेना पदाधिकारी तसेच खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com