कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त बेलापूर कार्यालयावर धडकणार
कोकण रेल्वे महामंडळात नोकरीमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्क असताना देखील त्यांना नोकरीत डावलले जात असून रेल्वे महामंडळ प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करीत आहे.यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाविरुद्ध रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त आंदोलन अधिक तीव्र करणार असून आता हे आंदोलक
कोकण रेल्वेच्या बेलापूर कार्यालयावर धडकणार आहेत.
रत्नागिरी येथे कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीची सभा पार पडली या सभेला रत्नागिरी,सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील सुमारे दीडशे प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.कोकण प्रकल्पग्रस्त कृती समितीचे कार्याध्यक्ष विनायक मुकादम, अमोल सावंत, प्रभाकर हातणकर यांनी या सभेला मार्गदर्शन केले व समितीमार्फत झालेल्या लढ्याची माहिती दिली. कोकण रेल्वे भरतीत भ्रष्टाचार होत असून त्याचे पुरावे आता पुढे आणले जाणार आहेत.
www.konkantoday.com