ऑस्ट्रेलियन सागाचा तोंड करून साठा केलेला पकडला
दापोली :-तालुक्यातील कुडावळेमधील जंगलात लपवून ठेवलेला ऑस्ट्रेलियन सागाचा लाखो रुपये किंमतीचा साठा वनविभागाने पकडला. मात्र हा साठा कोणी केला, झाडांची तोड कोणी केली, याचा शोध घेतला जात आहे .दापोली तालुक्यात रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेले ऑस्ट्रेलियन साग तोडणाऱ्या टोळ्य़ा सक्रिय झाल्या होत्या .खेर्डी ते कादिवली व वेळवी ते विरसई तसेच वेळवी ते बांधतिवरे आदी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा असणाऱया ऑस्ट्रेलियन सागाची तोड झाली .मात्र हा तोड केलेला ऑस्ट्रेलियन सागाचा साठा कोठे लपवून ठेवण्यात आला, याची माहिती मिळत नव्हती. गेले आठवडाभर तालुक्यातील भानघर, तांबडीकोंड व कुडावळे येथील जंगल यासाठी पिंजून काढले गेले . हा साठा कुडावळे येथील नदीलगत असणाऱ्या एका खासगी जागेत लपवून ठेवल्याची माहिती प्राप्त झाली . वनविभागाचे वनरक्षक एस. बी. वडर यांनी या साठय़ाला सील केले.
www.konkantoday.com