दुकान फोडून पंधरा हजाराचा माल लांबविला
रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथील इंदुलकर कलर्स हे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले व त्यांमधून लॅपटॉप व रोख रक्कम पंधरा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार शहर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे .यातील फिर्यादी सचिन वायंगणकर हे इंदुलकर कलर्सया दुकानात कामाला आहेत.अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर फोडून त्यातील लॅपटॉप व रोख रक्कम असा पंधरा हजार रुपयांचा ऐवज लांबविला हा प्रकार लक्षात आल्यावर त्याने पोलिसांना तक्रार दाखल केली.
www.konkantoday.com