तरुणीला लज्जास्पद मेसेज पाठवणाऱ्या तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल
आपल्या पूर्वीच्या मैत्रिणीच्या मोबाइलवर लज्जास्पद मेसेज पाठविणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन यादव राहणार महाबळेश्वर असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण व यातील फिर्यादी तरुणी हे एका फायनान्स कंपनीत नोकरीला होते या काळात दोघांची मैत्री जमली होती परंतु कालांतराने त्यांचे खटके उडू लागल्याने या तरुणीने या तरुणा बरोबरचे संबंध तोडले होते. तरी देखील हा तरुण त्या तरुणीच्या मोबाइलवर लज्जास्पद मेसेज पाठवत होता तसेच तिला वारंवार फोन करुन तिचा पाठलाग करत होता. शेवटी या तरुणीने पोलीस स्थानकात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
www.konkantoday.com