पंकज कदम मृत्यूप्रकरणी दोन वैद्यकीय अधिकारी सक्तीच्या रजेवर

दापोली येथील टेटवली गावातील पंकज कदम यांच्या उपचाराबाबत वैद्यकीय अधिकार्‍यांनी हलगर्जीपणा दाखवल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला होता. सर्पदंश झाल्याने रुग्णालयात दाखल झालेल्या पंकजवर उपचार वेळेवर न झाल्याने पंकजांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा मागणीसाठी पंकजच्या नातेवाईकांनी केली होती. त्यांचा मृतदेह रस्त्यावर ठेवला होता यात पोलिसांनी सामंजस्याची भूमिका घेऊन हे प्रकरण मिटवले होते. मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी नातेवाईक करीत होते. या प्रकरणासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी चौकशी पथकाची नेमणूक केली असून दापोली येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिवदास चव्हाण व डॉक्टर बालाजी सगरे यांना सध्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button