राज्यस्तरीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत रत्नागिरीचे खेळाडू चमकले
रत्नागिरी: महाराष्ट्र पॉवरलिफ्टींग असोसिएशनच्या मान्यतेने व नागपूर जिल्हा पॉवरलिफ्टींग असोसिएशनच्यावतीने नागपूर येथे ३६ वी सिनिअर राज्यस्तरीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत रत्नागिरीतील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत पाच सुवर्णपदके जिंकली. महिलांमध्ये ४७ कि.ग्रॅम. वजन गटात साक्षी झोरे यांनी एक सुवर्ण व एक रौप्य, प्राची सुपल यांनी एक रौप्य व एक कांस्य, सलोनी डांगे यानी एक कांस्य तर ५२ कि.ग्रॅम वजन गटात दिशा गुरव यांनी दोन रौप्य, ५७ कि. ग्रॅम वजन गटात मनाली कारकर हिने कांस्य, तर ७२ कि. ग्रॅम. वजन गटात सोनल गुरव हिने दोन सुवर्ण तर राखी दाते हिने चौथे स्थान मिळवले. पुरूष १२० गटात शेखर शिंदे याने दोन सुवर्ण पदके मिळवली. या स्पर्धेत रितेश घवाळी, अनिकेत गुरव, विशाल येडवे, मार्तंड झोरे, रोहित गवंडे, विनोद चव्हाण आदींनी भाग घेतला.
__________________________
कोकणातील ताज्या बातम्या व्हॉट्सअॅपवर वाचण्यासाठी कोकणटुडे व्हॉट्सअॅप ग्रुपवर सामील व्हा
_________________________
https://chat.whatsapp.com/K0I8GnYg9qHKtqaNeS63Oz