मागासवर्गीय व शासकीय वसतिगृहातील गैरसोई व समस्यांबाबत विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन
रत्नागिरी:चिपळूण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहातील चिपळूण-खेर्डी येथील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या वसतिगृहातील चाललेला बेजबाबदार कारभार आणि कर्मचार्यांचे वर्तन यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी अनेकवेळेला गृहपाल व समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे अर्ज व विनंत्या करूनही त्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आज समाजकल्याण कार्यालय रत्नागिरी यांच्यासमोर धरणे आंदोलन केले. या मागण्यांमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे अन्न मिळावे, चांगल्या प्रकारच्या सेवा मिळाव्यात, वसतिगृहातील मुलांशी व्यवस्थित वागणूक न देणार्या कर्मचार्यांवर कारवाई करा अशा या मुलांच्या मागण्या आहेत.
www.konkantoday.com