शहरातील खालच्या भागातील रस्त्याचे खड्डे बुजवा, नागरिकांची मागणी
रत्नागिरी :रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्याला पडलेले खड्डे बुजविण्याचे काम रत्नागिरी नगर परिषदेने सुरू केले असून सध्या पावसानेही उघडीप घेतल्यामुळे हे काम वेगाने सुरू आहे. शहरातील खालील भागात असणार्या रस्त्यांची देखील अवस्था जीर्ण झाली असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे अनेक वर्षापासून असूनही त्याची दुरूस्ती केली जात नाही. त्यामुळे नागरिकांच्यात नाराजी आहे. काही ठराविक रस्त्यावरच सतत डांबरीकरण केले जाते. त्यामुळे जयस्तंभापासून खालील भागात देखील नागरिक राहतात याची नोंद नगर परिषदेने घ्यावी अशी मागणी या भागातील ऍड. धनंजय भावे यांनी केली आहे.
www.konkantoday.com