जिल्हा रूग्णालयाच्या बाबतीत आ. सामंत यांनी शब्द पाळला
रत्नागिरी :रत्नागिरी शासकीय रूग्णालयात जागेअभावी रुग्णांची गैरसोय होत असल्याने म्हाडाचे अध्यक्ष आ. उदय सामंत यांनी रुग्णालयाला भेट देवून पाहणी केली होती व नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत रूग्णांची सोय करण्याची सूचना केली होती. मात्र या इमारतीत वॉर्ड सुरू करण्यासाठी साधनसामुग्री नसल्याचे अधिकार्यांनी सांगितल्यावर सामंत यांनी स्थानिक व्यावसायिकाला हे साहित्य पुरवण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे त्या स्थानिक व्यावसायिकाने आता वॉर्डसाठी आवश्यक असलेल्या खाटा, बेडशीट, चादरी उपलब्ध करून दिले असून हे साहित्य आता रूग्णालयात पोहोच झाले आहे. त्यामुळे आता या ठिकाणी सरकारी प्रक्र्रियेची वाट न पाहता रूग्णांसाठी वॉर्ड लवकरच सुरू होणार आहे.
www.konkantoday.com