रत्नागिरी: हायटेक एमआरआय स्कॅन, कलर डॉपलर, पॅथॅलॉजी लॅबरोटरी, डिजिटल एक्सरे आणि सोनोग्राफी अशा सुविधा असलेले प्राईम डायगोस्टिक सेंटरचा शुभारंभ जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे हे उपस्थित होते. डॉ. तरन्नुम खलिफे यांनी हे सेंटर सुरू केले असून त्या राजापुरचे नगराध्यक्ष ऍड. समीर खलिफे यांच्या पत्नी आहेत तर आमदार हुस्नबानू खलिफे यांच्या त्या स्नुशा आहेत.
रत्नागिरी शिवाजीनगर येथील राजमाता को. ऑप. बँकेसमोरील यशश्री अपार्टमेंटमध्ये हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. यावेळी या कार्यक्रमाला एम.डी. रेडिओलॉजिस्ट डॉ. गिरीष काकडे, डॉ. अनिरूद्ध जगताप, प्रशांत इनामदार, सुनील सरतापे, निलेश बळी, दिपक बागडे यांच्यासह मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड यांच्यासह वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
www.konkantoday.com