गणपती पुळे येथे पर्यटक बुडाले दोन महिला व एका पुरुषाचा समावेश
गणपतीपुळे समुद्रावर समुद्राचा आनंद घेण्यासाठी समुद्रात गेलेल्या पर्यटकांपैकी तीन पर्यटक बुडाले आहेत.सदर पर्यटक हे कसबा बावडा, कोल्हापूर येथील आहे, मूळ गाव हुबळी, कर्नाटक असल्याची माहिती मिळाली आहे.
काजल रोहन मचले, वय 17 वर्षे,सुमन विशाल मचले वय 25 यांचे मृतदेह मिळाले आहेत.तर उमेश अशोक बागडे, वय 28 हा बेपत्ता आहे.
या दुर्घटनेतून किसन मचले,पूजा बागडे, निर्मला मचले, ऐश्वर्या मिनेकर हे वाचले आहेत.या सर्वांना स्थानिक सुरक्षा रक्षकांनी व जीवरक्षकांनी वाचवले.
www.konkantoday.com