खासदार सुनील तटकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जगबुडी नदीवरील नवा पूल छोट्या वाहनांसाठी खुला करुन दिला
गेले अनेक दिवस चर्चेत असलेला जगबुडी नदीवरील पुलाबाबत आज खासदार सुनील तटकरे ,आमदार भास्कर जाधव,आमदार संजय कदम यांनी जगबुडी पुलाला भेट दिली. हा पूल सुरू करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यानंतर अधिकाऱ्यांनी हा पूल छोट्या वाहनांसाठी खुला करण्यास परवानगी दिली.तटकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसह गाडीत बसून पूल पार केला व त्यानंतर पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली.यावेळी खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी देखील गाडी च्या दरवाजात उभे राहून आपला सहभाग नोंदवून आनंद व्यक्त केला. पूल चालू झाला नाही तर आपण तिथे ठिय्या देऊन बसणार असा इशारा खासदार सुनील तटकरे यांनी दोन दिवसांपूर्वी रत्नागिरीत दिला होता. मुंबई गोवा महामार्गावर महत्त्वाचे ठिकाण असलेल्या हा पूल अतिवृष्टीच्या काळात अनेक वेळा बंद ठेवावा लागला होता त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला हाेता.आता गणपती उत्सवाला येणाऱ्या चाकरमान्यांना या पुलावरून सुरक्षित वाहतूक करता येणार आहे.
www.konkantoday.com