भाजपच्या पुरग्रस्त सहाय्यता समितीत सिंधुदुर्ग, रत्नागिरीला स्थान नाही?
रत्नागिरी: पश्चिम महाराष्ट्र व कोकणात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून आता भारतीय जनता पक्षाने पुरग्रस्त सहाय्यता समिती स्थापन केली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसलेला असतानाही रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हयातील प्रतिनिधींना या समितीत स्थान दिले नसल्याचे कळते. यामुळे कोकणात भाजपला ताकद वाढवायची की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
www.konkantoday.com