प्रसन्न कांबळी यांचा ७९१ वा उकडीच्या मोदकांचा कार्यक्रम पुण्यात
रत्नागिरी:रत्नागिरीतील हुरहुन्नरी कलाकार प्रसन्न कांबळी यांचा मोदकाच्या प्रशिक्षणाचा ७९१ वा कार्यक्रम आज पुण्यात धनकवाडी येथे मा. शरद पवारजी सभागृहात होणार आहे. कांबळी यांचे मोदकाचे विविध कार्यक्रम झाले असून वेगवेगळ्या प्रकारचे मोदक झटपट करून ते समोरच्याला अचंबित करून टाकतात. त्यांचे विविध कार्यक्रम टीव्ही चॅनेलवरदेखील झाले आहेत. आतापर्यंत त्यांनी ४१००० महिलांना मोदकाचे प्रशिक्षण दिले आहे. आज दुपारी पुणे येथे २.३० वा. होणार आहे.
www.konkantoday.com