तिवरेतील आपदग्रस्तांसाठी कंटेनर आले
रत्नागिरी: तिवरे धरण फुटीतील आपदग्रस्तांसाठी तात्पुरती निवास व्यवस्था म्हणून सुसज्ज असे कंटेनर आणण्यात आले असून एकूण १५ कंटेनर येणार असून त्यातील पहिले तीन कंटेनर आता या ठिकाणी दाखल झाले आहेत. उर्वरित कंटेनर लवकरच दाखल होणार आहेत.
मुंबईतून एका कंपनीकडून हे कंटेनर मागविण्यात आले असून या कंटेनरमध्ये स्वच्छतागृहापासून राहण्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आले आहेत. ३०० स्क्वे. फूटच्या एका कंटेनरला ४ लाख रु. खर्च येणार असून पाच कंटेनरचा खर्च रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक करणार आहे.
www.konkantoday.com