सीए परीक्षेत रत्नागिरीच्या आठ विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश
नुकत्याच सीए इन्स्टिटय़ूटतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत रत्नागिरीतील आठ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.यामध्ये प्रणोती कबाडे हिने भारतात २७वा क्रमांक मिळविला तर नयन सुर्वे हिने ४४वा क्रमांक मिळविला. याशिवाय मयुरी भुवड, चैतन्य वैद्य, श्रावणी देशपांडे,आदिती करमरकर, साज माल मल्लिक, शरदचंद्र वझे यांनी चांगले यश मिळविले. हे सर्व विद्यार्थी उज्ज्वला क्लासेसचे मार्गदर्शन घेत होते.आतापर्यंत सीए फायनलसाठी रत्नागिरीत कोचिंग उपलब्ध होत नव्हते. आता उज्ज्वला क्लासेस येथे हे कोचिंग उपलब्ध झाले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे क्लासचे संचालक पुरुषोत्तम पाध्ये यांनी अभिनंदन केले आहे.
www.konkantoday.com