प्लॅस्टिक मुक्त भारत चा संकल्प,पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधिले
स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. आपल्या भाषणामध्ये त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले.
मोदींनी आपल्या भाषणामध्ये भ्रष्टाचार, गरीबी, पूरपरिस्थितीपासून सरकारी योजनांपर्यंत अनेक विषयांना मोदींने हात घातला. त्याचबरोबर त्यांनी नाव न घेता काँग्रेसवर अनेक मुद्द्यांवरुन टिका केली.
5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं स्वप्न शक्य असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.70 वर्षांमध्ये अर्थव्यवस्था 02 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचली; मात्र त्यानंतर अवघ्या 05 वर्षांत अर्थव्यवस्था 01 ट्रिलियन डॉलरनं वाढली असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले. लोकांच्या आयुष्यातील सरकारची ढवळाढवळ टाळण्यासाठी अनेक कायदे रद्द केले पण वाढती लोकसंख्या देशासमोरील गंभीर समस्या असून त्यावर सर्वांनी लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे असे ते म्हणाले.चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद अस्तित्त्वात येणार आहे अशी पंतप्रधानांनी घोषणा केली.त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ऑक्टोबर गांधी जयंतीचे स्मरण करून प्लॅस्टिक मुक्त भारत हा संकल्प करूया असे ही ते म्हणाले. भारत मातेच्या भूमीचे रक्षण करण्यासाठी त्यांनी शेतकरी बंधूंना केमिकल युक्त खत वापरणे टाळावे अशी विनंती केली.
www.konkantoday.com