डिसेंबरपासून एनईएफटीचे व्यवहार २४ तास करण्याचा निर्णय

बँक खात्यातील रकमेची देवाणघेवाण ऑनलाईन करणार्‍या ग्राहकांसाठी एनईएफटी ही सेवा २४ तास खुली करून देण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. सध्या एनईएफटीच्या सुविधेची वेळ सकाळी ८ ते सायं. ७ पर्यंत होती. बँकेचे कामकाज सुरु असतानाच ही सेवा उपलब्ध होती. सुट्टीच्या काळात या सेवेचा वापर ग्राहकांना करता येत नव्हता. यामुळे रिझर्व्ह बँकेने या सेवेत बदल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून डिसेंबरपासून ही सेवा २४ तासांसाठी उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे ग्र्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button