चिपळूण : पुरग्रस्त परिस्थितीतून नागरिक सावरून जनजीवन सुरळीत होत असतानाच चिपळूण शहरातील एटीएममध्ये पैशाचा खडखडाट झाल्याने ग्राहकांना पैसे मिळू शकले नाहीत. शनिवार, रविवार व त्यानंतर आलेल्या ईदीमुळे तीन दिवस सुट्ट्या आल्या. त्यात अनेक बँकांच्या एटीएम सेंटरवर पैशाचा खडखडाट झाल्यामुळे अनेक ग्राहकांना पैसे मिळू शकले नाहीत. ऍक्सीस बँकेच्या खात्यात पैसे होते परंतु तेथे इंटरनेटची सेवा विस्कळीत असल्याने तेथेही निराशा पदरी पडली. त्यामुळे अनेक ठिकाणी एटीएम बंद असल्याच्या सूचना झळकल्या. त्यानंतर उशीरा स्टेट बँकेच्या एटीएममध्ये कॅश आल्यानंतर पैसे उपलब्ध होवू शकले.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here