गोगटे कॉलेजसह शहरातील उंच होर्डिंग्ज हटवावीत: जि.प.चे माजी सभापती सतिश शेवडे यांची मागणी
रत्नागिरी:रत्नागिरी शहरातील होर्डिंग्ज पादचार्यांसाठी जीवघेणी ठरू शकतात ती त्वरित बाजूला करावीत अशी मागणी जि.प.चे माजी उपाध्यक्ष सतिश शेवडे यांनी रत्नागिरी नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांना पत्र देऊन केली आहे. रत्नागिरी शहरात विविध ठिकाणी तसेच कॉलेज परिसरात भलीमोठी लोखंडी होर्डिंग्ज एकमेकांवर उंच लावण्यात आली आहेत. वादळी वारा, पाऊस यामुळे या होर्डिंग्जपासून रस्त्यावरून जाणार्या पादचार्यांना धोका निर्माण होवू शकतो. यामुळे रत्नागिरी शहरातील विविध ठिकाणी अशी उंच मनोरे करून लावण्यात आलेली होर्डिंग्ज हटविण्यात यावीत व त्यांना विशिष्ट उंचीचीच परवानगी देण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली आहे. याशिवाय रत्नागिरी गोगटे कॉलेज परिसरात अशीच धोकादायक पद्धतीने होर्डिंग्जची उभारणी झाली आहे. या परिसरात शाळा व कॉलेजीस असल्यामुळे ही होर्डिंग्ज लहान मुलांच्या व कॉलेज विद्यार्थ्यांच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतात असे त्यांनी म्हटले आहे.
www.konkantoday.com