३२ कोटी रुपये डिझेल परताव्यापोटी आवश्यक असताना फक्त ६ कोटी रुपये प्राप्त
जिल्ह्यासाठी डिझेल परताव्यापोटी फक्त साडेसहा कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.प्रत्यक्षात जास्त आवश्यकता असताना पण कमी पैसे प्राप्त झाल्याने मच्छीमारांमध्ये नाराजी पसरली आहे. ऐकुण ३२ कोटी रुपये आवश्यक असताना प्रत्यक्षात मात्र साडेसहा कोटी रुपये दिले आहेत. गेल्या आठवड्यात ही रक्कम मत्स्य विभागाकडे प्राप्त झाली आहे. आधीच मच्छीमार आर्थिक संकटात सापडलेला असताना डिझेल परताव्याच्या रुपाने त्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती, ती फोल ठरली आहे. जिल्ह्यातील सुमारे दोन हजारहून अधिक मच्छीमारांना गेल्या साडेचार वर्षातील परताव्याची प्रतीक्षा आहे.
www.konkantoday.com