
तरुणाची ऑनलाइन फसवणूक ,खात्यातील पैसे लांबविले
बोनस जमा करायचा आहे असे सांगून क्रेडिट कार्डचे डिटेल्स घेऊन त्याच्या खात्यातील ३२०००रुपये काढून घेण्याचा प्रकार चिपळूण येथे घडला आहे.चिपळूण येथील दोडवली शिर्के वाडीत राहणारा मंदार चांदिवडे यांच्या मोबाइलवर ईशा नावाच्या तरुणीने फोन केला आपण एक्सिस बँकेतून बोलत असून आपल्याला तुमच्या खात्यावर बोनस जमा करावयाचा आहे त्यासाठी बँकेचे व एटीएम कार्डचे संपूर्ण तपशील द्यावा असे सांगितले.बोनस जमा होणार म्हणून मंदार याने सर्व बँक डिटेल्स त्या महिलेला दिले त्यानंतर मंदारच्या खात्यातील बत्तीस हजार रुपये ऑनलाइन काढून घेण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे कळताच मंदारयाने चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com