
पंढरपुरात उभी राहणार १०० फुटी उंचीची विठ्ठल मूर्ती
पंढरपूर-प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई हे पंढरपुरात आता १०० फुटापेक्षा जास्त उंचीची विठ्ठलमूर्ती बसविण्याच्या तयारीत आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी विठ्ठलाच्या भव्य मूर्तीची संकल्पना मांडल्यानंतर देसाई यांनी ही मूर्ती उभारण्याची सहमती दर्शविली आहे. पंढरपुरातल्या मंदिरात जशी मूर्ती आहे तशीच ही मूर्ती साकारण्याचा आपला प्रयत्न राहिल असे देसाई यांनी सांगितले आहे. मात्र या मूर्तीसाठी जागा व अन्य प्रक्रिया अद्याप पूर्ण व्हायची आहे. ही मूर्ती उभारली गेली तर ती भाविकांच्या व पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षण ठरणार असून पंढरपुरच्या सौंदर्यात भर पडणार आहे.