विधानसभा निवडणुकीमुळे महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलल्या
रत्नागिरी ः अनेक वर्षानी महाविद्यालयीन निवडणुका घेण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर या निवडणुका होतील असे चित्र असताना विधानसभा निवडणुकीमुळे या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय माहिती व उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतला आहे. महाविद्यालयीन निवडणुका २५ वर्षानंतर सुरू करण्यात येणार होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्यात उत्साहाचे वातावरण होते परंतु राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होणार असून त्याची आचारसंहिता पुढील काही दिवसात लागू होणार आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर ताण येणार असल्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
www.konkantoday.com