
गुहागरवासियांकडे खातेप्रमुखांचे दुर्लक्ष ः माजी आमदार विनय नातू यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
गुहागर : अतिवृष्टीचा गुहागर तालुक्याला मोठा फटका बसलेला असताना देखील आपत्ती व्यवस्थापनामधील सर्व खाते प्रमुखांकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार माजी आमदार व भाजपचे नेते डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यातील सर्व खातेप्रमुख मुख्यालयाच्या ठिकाणी न राहता शहराबाहेर राहत आहेत. तसेच संबंधित अभियंता, तलाठी, ग्रामसेवक, मंडल अधिकारी हे देखील गुहागरमध्ये रहात नसल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. मोडकाआगर पुलाबाबत पर्याय काढण्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. अनेक घरांना तडे गेले असले तरी त्यांना पर्यायी व्यवस्था दिली गेली नाही. यामुळे या ठिकाणी ग्रामस्थांच्यात नाराजी असून याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
www.konkantoday.com