
रत्नागिरीचा शौर्य बोरसुतकर हा बालकलाकार जाणार अमेरिकेच्या स्टेजवर
रत्नागिरी ः रत्नागिरीतील प्रसिद्ध किरण डान्स ऍकॅडमी व सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलचा विद्यार्थी शौर्य किरण बोरसुतकर याची आता अमेरिकेत लॉस एंजिलेस येथे होणार्या डान्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नुकत्याच चेन्नई येथे झालेल्या वर्ल्ड ऑफ डान्स या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये सातारा येथील श्रीकेश मगरडान्स क्रिव्ह यांच्या ग्रुपमधून तो सहभागी झाला होता. या ग्रुपमध्ये आयुष खुले (सातारा), हर्ष पटेल (सातारा), रोशनी हुगळीकर, आर्यन गुजर (सातारा), शौर्य बोरसुतकर (रत्नागिरी) हे सहभागी झाले होते.
चेन्नई येेथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व श्रीकेश डान्स मगर क्रिव्हने केले होते. या स्पर्धेमध्ये ५० हून अधिक ग्रुप सहभागी झाले होते. ज्युनिअर गटात श्रीकेश मगर डान्स क्रिव्हचा तिसरा क्रमांक आला. अमेरिका येथील लॉस एंजिलेस येथे होणार्या फायनल राऊंडमध्ये या संघाची निवड झाली आहे. या डान्स क्रिव्ह कोरिओग्राफर श्रीकेश मगर यांच्या सुंदर कोरिओग्राफीचे सर्वांनी कौतुक केले. रत्नागिरीतील शौर्य बोरसुतकरची निवड झाल्याने सर्वत्र त्याचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
www.konkantoday.com