आज गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधीत केले.ते म्हणाले ३७० कलमामुळे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद, फुटीरतावाद, घराणेशाही आणि भ्रष्टाचारातच वाढ झाली. जम्मू-काश्मीरमधील तरुणांची माथी भडकावण्यासाठीच पाकिस्तानने ३७० कलमाचा शस्त्रासारखा वापर केला. ३७० कलम हटविल्याने सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वप्नच साकार झाल्याचे मोदींनी म्हटले आहे.शिक्षण, आरोग्य तसेच पायाभूत सुविधा वाढविण्यास प्रयत्न केला जाणार आहे. जम्मू-काश्मीरमधील सफाई कर्मचारी, दलितांना सुविधा मिळणार आहेत. आपल्या देशात कोणतेही सरकार असो, ते संसदेत कायदा बनवून देशाच्या भल्यासाठी कार्य करते. लडाख हा केंद्र शासित प्रदेशच राहणार आहे. त्यामुळे लडाखच्या विकासाच्या कक्षा रुंदावल्या आहेत.देशातील सर्व चित्रपट निर्मात्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये आपल्या चित्रपटांचे चित्रीकरण करण्यास प्राधान्य द्यावे. हिंदी, मराठी, तेलुगू, तमीळ, मल्याळम आदी चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांनी जम्मू-काश्मीर सारख्या राज्याला चित्रीकरणास बिनदिक्कत जावे.जम्मू-काश्मीरची जनता आपला प्रतिनिधी निवडणुकेच्या माध्यमातून निवडू शकणार आहे. येथील प्रत्येकाचा मतदान हक्क अबाधीत आहे. राज्यात लवकरच निवडणूका होतील. दहशतवाद, फुटीरतावाद्यांचा आता नायनाट करणे शक्य झाले आहे. काही लोकांनी काश्मीरचा वापर करून घेतला. त्यांच्या राजकारणाच्या खेळात येथील जनता मागे पडली. फायदा घेणा-या राजकीय नेत्यांनी मोठा भ्रष्टाचार करून जनतेची फसवणूक केली आहे.जम्मू-काश्मीरमध्ये उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन देणार.कलम ३७० मुळे राज्यातील तरुण-तरुणींचे नुकसान झाले. अल्पसंख्यांक आपल्या अधिकारापासून वंचीत होते.कलम ३७० व ३५ ए मुळे काश्मीरमध्ये फक्त दहशतवाद फोफावला. या दहशतवादाचा खात्मा करण्यासाठीच कलम ३७० रद्द करण्यात आले. आता केंद्रशासित प्रदेश झाल्यामुळे या राज्याचा तसेच येथील जनतेचा विकास होणार आहे.कलम ३७० व ३५ ए मधून काश्मीरला मुक्त करणे सरदार पटेलांचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. गेली अनेक वर्षे काश्मीरवासीय विकासापासून वंचीत होते. मात्र, आता काश्मिरच्या त्यांच्यासाठी विकासाची कवाडे खूली झाली आहेत.जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द होणे गरजेचे होते. आता ख-या अर्थाने या राज्याचा विकास होणार आहे. या पूर्वीच्या सरकारांनी जम्मू-काश्मीरच्या जनतेला फसवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here