महाडमध्ये व पोलादपूरमध्ये पावसाची विक्रमी नोंद
महाड व पोलादपूर तालुक्यात गेल्या आठ दिवसात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये महाड शहरासह तालुक्यात पावसाने ठिय्या मांडला आहे. महाडच्या आपत्ती नियंत्रण कक्षातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, महाड,पोलादपूर तालुक्यात गेल्या पाच दिवसांमध्ये दोन हजार मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. दोन्ही तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. याचा फटका महाड पोलादपूरसह तालुक्यातील छोट्या उद्योगांना झालेला दिसुन येत आहे. महाड औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजला असून कंपनीच्या उत्पादनावर याचा थेट परिणाम होत असल्याची माहिती कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आगामी अठ्ठेचाळीस तासात कोकणामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता असून नागरिकांनी अत्यावश्यक असेल तर घराबाहेर पडावे अशी सुचना देण्यात आली आहे.
www.konkantoday.com