
मिरजोळे येथे जमीन खचली
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडता आहे.त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी जमीन व रस्ता खचण्याचे प्रकार घडत आहेत. तालुक्यातील मिरजोळे येथे जमीन खचण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वारंवार घडत आहेत. रविवारी मध्यरात्री या भागात पुन्हा भूस्खलन होऊन जमिनीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे.
www.konkantoday.com