आंतरराष्ट्रीय स्तरावरचा मानला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार उमेश पाडवी यांना जाहीर
रत्नागिरी ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकवली नं. २ ता. दापोली जि. रत्नागिरीमधील शिक्षक उमेश पाडवी यांची ७० देशांमध्ये मानल्या जाणार्या आंतरराष्ट्रीय ग्लोबल टीचर ऍवॉर्डसाठी निवड झाली आहे. आस्क एज्युकेशनच्या माध्यमातून हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाते. त्यामध्ये संबंधिताची पर्चेस व मुलाखत घेतली जाते. त्यानंतर सगळ्या बाबींचा विचार करून उमेदवाराची पात्रता ठरविली जाते. दरवर्षी जागतिक स्तरावर या आस्क एज्युकेशन पुरस्काराबाबत आवाहन केले जाते. जगातील ७० देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांना व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य व सामाजिक बाबींचा विचार करून त्या व्यक्तीला ग्लोबल टीचर पुरस्कार दिला जातो. यामध्ये दापोली वाकवली शाळेच्या उमेश पाडवी यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. पुरस्कार करंडक व अन्य मानपत्र पुरस्कार विजेत्यांना दिले जाते. नवी दिल्ली गुरूग्रामच्या लीला ऍम्बीयन्स गुरूग्राम हॉटेल एमबीएन्स आयलंड या पंचतारांकीत हॉटेलमध्ये दि. १५ सप्टेंबर २०१९ रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात राहून शैक्षणिक कार्य करणार्या उमेश पाडावी यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
www.konkantoday.com