म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली जिल्हा रुग्णालयाला आकस्मिक भेट
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयासाठी सन २०१० मध्ये १०० बेडक्षमतेचे नवीन ४ वॉर्ड मंजूर झाले.या नव्या इमारतीचे काम पूर्ण होऊन त्याचे हस्तांतरण जिल्हा रुग्णालय रत्नागिरी यांच्याकडे करण्यात आले तरी ही सदरचे वॉर्ड सुरू न झाल्याने रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत.अनेक रुग्णांना जमिनीवर झोपावे लागत आहे.
या परिस्थितीची म्हाडा अध्यक्ष ना.उदय सामंत यांनी गांभीर्याने दखल घेत जिल्हा रुग्णालयाला आकस्मिक भेट दिली आणि तातडीने निर्णय घेत किमान ५० बेड तातडीने उपलब्ध करून देण्याची भूमिका घेतली .म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांच्या प्रयत्नांमुळे ४ पैकी २ वॉर्ड तातडीने सुरू करण्याचे नियोजन झाले असून रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे.यावेळी सिव्हिल सर्जन ए.एन.बोल्डे, डॉ. विटेकर, उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप,माजी जि.प.उपाध्यक्ष राजेश मुकादम,शाखा अभियंता जनक धोत्रेकर,विभागप्रमुख परेश सावंत,पत्रकार उपस्थित होते.
www.konkantoday.com