सावज मिळाले नाही म्हणून बिबट्याने २६५कोंबड्या केल्या फस्त

0
266

संगमेश्वर तालुक्यात
बिबट्याने पिरंदवणे येथील एका कोेंबड्यांच्या पोल्ट्रीची जाळी तोडून तब्बल बिबट्याने २६५ कोंबड्या फस्त केल्याची घटना शनिवारी घडली.
दशरथ रामचंद्र घेवडे असे नुकसानग्रस्त पोल्ट्री मालकाचे नाव आहे. घेवडे यांचा पोल्ट्रीचा व्यवसाय असून घरालगतच पोल्ट्री आहे. शुक्रवारी रात्री बिबट्या सावजाचा शोधात असताना त्याने आपला मोर्चा पोल्ट्री फार्मकडे वळविला बिबट्याने जाळी तोडून पोल्ट्रीमधील ५०० पैकी २६५ कोंबड्या फस्त केल्या.
नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी घेवडे पोल्ट्रीकडे गेले असता, त्यांच्या ही बाब निदर्शनास आली. हा प्रकार गावचे पोलीस पाटील अनिल भामटे यांनी वनरक्षक शर्वरी कदम यांच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे घेवडे यांचे सुमारे ७५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here