सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात वाढ
सिंधुदुर्ग ः सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात पाच कोटी रुपयांच्या खर्चाची वाढ करणारी मंजुरी वित्त समितीच्या सभेत करण्यात आली. त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पाची रक्कम आता २१ कोटी ३९ लाख रुपये अशी झाली आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
www.konkantoday.com