सिंधुदुर्ग ः शासनाने पर्यटन विकासासाठी पर्यटन संचलनालयाची स्थापना केली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकण विभागाचे प्रादेशिक कार्यालय व उपसंचालक पदही उपलब्ध केले आहे परंतु आता ही सर्व पदे भरण्यासाठी कोकण भुवन नवी मुंबईचा पत्ता दाखविण्यात आल्याने हे नेमके कार्यालय नवी मुंबईत राहणार की सिंधुुदुर्गात हा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यटन विकासाला चालना द्यावयाची असेल तर हे कार्यालय सिंधुदुर्गात असणे गरजेचे आहे. हे जर कार्यालय स्थापन झाले तर त्यामार्फत पर्यटन विकास प्रकल्प राबविणे, त्याची पूर्तता करणे, प्रकल्पावर नियंत्रण ठेवणे, पर्यटनविषयक नवीन योजना व प्रकल्प सुचविणे आदी कामे सहजगत्या होवू शकणार आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गात मंजूर झालेले पर्यटन संचलनालय प्रादेशिक कार्यालय मुंबईत जाणार की काय? अशी भीती सिंधुदुर्गवासियांमध्ये निर्माण झाली आहे.
www.konkantoday.com
Home स्थानिक बातम्या शासनाने स्थापन केलेले पर्यटन संचलनालयाचे मुख्य कार्यालय सिंधुदुर्गमध्ये राहणार की नवी मुंबईत?