
आंबेनळी दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण ः अनेक उपक्रमांनी मृतांना श्रद्धांजली
रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठातील ३० कर्मचारी व अधिकारी वर्षासहलीसाठी महाबळेश्वर येथे निघाले असता आंबेनळी घाटात विद्यापीठाची बस खाली कोसळून गेल्या वर्षी झालेल्या अपघातात ३० जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेला आता १ वर्ष पूर्ण झाले. तरी देखील जिल्हावासियांना या घटनेचे अद्यापही विस्मरण झालेले नाही. कोकण कृषि विद्यापीठाच्या अधिकार्यांनी व कर्मचार्यांनी या घटनेत मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी या अपघातात बळी पडलेल्या आपल्या सहकार्यांच्या स्मृति जाग्या झाल्या. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी पुष्पचक्र अर्पण करून या सर्वांना श्रद्धांजली वाहिली. दापोली शहरातील फ्रेंडस्शीप संस्थेने आंबेनळी घाटात अपघातस्थळी जावून श्रद्धांजली वाहिली. एकीकडे एक वर्ष होवूनही या अपघातात बळी पडलेल्या कर्मचार्यांच्या वारसाला नोकरी देण्याचा प्रश्न अद्यापही लाल फितीत अडकलेला आहे. तो लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com