
स्थलांतराच्या नोटिसा भलत्याच वाडीला पाठवल्या ,सरकारी कारभाराचा नमुना
अतिवृष्टीमुळे सावधगिरीचा इशारा म्हणून नागरिकांना स्थलांतर करण्याच्या नोटिसा ज्या वाडीला काढायला पाहिजे होत्या त्या ऐवजी भलत्याच वाडीला नोटिसा काढण्याचा प्रकार चिपळूण तालुक्यात घडला आहे. अतिवृष्टीमुळे चिपळूण गोवळकोट येथील कदम बौद्धवाडीतील दरडींच्या पार्श्वभूमीवर भू वैज्ञानिकांनी अहवाल दिल्याप्रमाणे त्या भागातील नागरिकांना स्थलांतराच्या नोटीसा देण्याचा आदेश सरकारने काढला. या नोटिसा कदमवाडी येथील ग्रामस्थांना देण्याऐवजी तलाठ्याने या नोटिसा गोवळकोट भोईवाडी व तारा बौद्धवाडी यांना दिल्या .अचानक स्थलांतराच्या नोटीसा आल्याने हे ग्रामस्थ हडबडून जागे झाले. तलाठय़ाने १४३ जणांना या नोटिसा बजावल्या होत्या. शेवटी ग्रामस्थांनी या नोटिसांशी आमचा आमचा काही संबंध नसल्याचे दाखवून दिल्यावर अखेर या नोटिसा थांबविण्यात आल्या.
www.konkantoday.com