खेर्डीच्या सरपंचांचे अपिल जिल्हाधिकार्यांनी फेटाळले
सदस्यांनी आणलेल्या अविश्वास ठरावाच्या विरोधात खेर्डीच्या सरपंच जयश्री खताते यांनी या ठरावाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले होते .मात्र जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हे अपील फेटाळून लावले आहे. सदस्यांच्या बाजूने अॅड विक्रांत वाडकर यांनी काम पाहिले. वाडकर यांनी केलेला युक्तिवाद जिल्हाधिकारी यांनी ग्राह्य धरून हा निकाल दिला. यामुळे खेर्डी ग्रामपंचायतीमध्ये नवा सरपंच निवडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
www.konkantoday.com