रत्नागिरी ः रत्नागिरीजवळील गणेशगुळे मेर्वी भागात गेल्या काही दिवसात अंधाराचा फायदा घेवून रस्त्यावरून जाणार्या स्कूटरचालकांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना जखमी करण्याचे दोन प्रकार लागोपाठ घडल्यानंतर वनखात्याने बिबट्याला पकडण्यासाठी मोठी फिल्डींग लावली. यासाठी त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी गणेशगुळे, मावळुंगे आदी भागात पिंजरे लावले. याशिवाय बिबट्याचा माग काढण्यासाठी काही भागात सीसीटीव्ही कॅमेरेही वनखात्याने लावले. मात्र ही यंत्रणा उभी केल्यानंतर चाणाक्ष असलेला बिबट्या त्या भागात फिरकतच नसल्याने वनखातेही या बिबट्याला कसे पकडायचे या काळजीत आहे. याशिवाय बिबट्याचा बंदोबस्त व्हावा यासाठी वनविभागाचे कर्मचारी गेल्या आठ दिवसात त्या भागात गस्तही घालत आहेत. परंतु गावकर्यांना व वनखात्याला हवा असलेला बिबट्या त्या भागातच फिरकत नसल्याने पिंजरा तर राहो पण कॅमेर्यातही तो पकडला जात नसल्याने ग्रामस्थांच्या काळजीत भर पडली आहे. या मार्गावरून जाणारे ग्रामस्थ भीतीच्या छायेत वावरत आहेत. गेले काही दिवस रत्नागिरी परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने हा बिबट्या या भागात येत नसावा असा अंदाज आहे.
www.konkantoday.com