हॅट्ट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी निवडणूक लढवू नये पालकमंत्री दीपक केसरकर यांचा सल्ला
नारायण राणे हे दोन वेळा हरले आहेत गेल्या विधानसभेला कुडाळमधून हरले तर पोटनिवडणुकीत वांद्रे मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला त्यामुळे ते ने आता हॅट्ट्रिक चुकवायची असेल तर पुन्हा निवडणूक लढवू नये असा सल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे
नारायणराव राणे हे कुडाळ मालवण मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचा सूतोवाच आमदार नितेश राणे यांनी एका कार्यक्रमात केला होता त्या पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांनी हे मत व्यक्त केले
एकदा हरला की तो किती मोठा नेता असला तरी पुन्हा निवडून येत नाही हा सिंधुदुर्गचा इतिहास आहे त्यामुळे राणे यांनी ही रिस्क घेऊ नये असे असे सांगून केसरकर यांनी विद्यमान शिवसेना आमदार वैभव नाईक यांचे काम चांगले असल्याने ते या मतदारसंघातून निवडून येतील असा दावाही केला.
www.konkantoday.com