रत्नागिरी एस.टी. विभागाने दोन वर्षात साडेचार कोटींचा तोटा कमी केला

0
221

रत्नागिरी ः एस.टी. महामंडळ नुकसानीत जात असतानाच रत्नागिरी विभागाने विभाग नियंत्रक विजयकुमार दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तर्‍हेने उपक्रम राबविल्याने दोन वर्षात अंदाजे साडेचार कोटी रुपयांचा तोटा कमी करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे तोटा कमी करण्याच्या विभागात रत्नागिरी विभाग दुसर्‍या स्थानावर आला आहे. पहिल्या स्थानावर जालना विभाग आहे. एस.टी. विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सहकार्‍यामुळेच हा तोटा कमी करणायत यश आल्याचे दिवटे यांनी सांगितले. विभाग नियंत्रक दिवटे हे २१ जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here