
ऑनलाईनवरून बुलेटची खरेदी पडली महाग ,तरुणाची बासष्ठ हजाराची फसवणूक
ऑनलाईनवरून जुनी बुलेट खरेदी करण्याचा मोह चिपळूणमधील एका तरुणाला महाग पडला असून त्याची या प्रकरणात बासष्ट हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे
चिपळूण शहरातील बुरूमतळी येथील राहणारा राहुल आटपाटकर याने ओएलएक्स वेबसाइटवर जुनी बुलेट पाहिली होती ही बुलेट आवडल्याने त्याने ऑनलाइन पद्धतीने ती खरेदी करायचे ठरवले बुलेट मालकाने दिलेल्या अकाऊंटवर पेटीएम व पे फोन फोनद्वारे बासष्ट हजार रुपये जमा केले पैसे जमा करूनही या तरुणाला बुलेट ताब्यात मिळाली नाही यामुळे या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे उघड झाल्यावर त्याने पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com