रत्नागिरी शहरात पंचेचाळीस लाखांचे कोकेन जप्त ,तीन जणांची टोळी पकडली
स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांनी रत्नागिरी एमआयडीसीत छापा घालून सुमारे पंचेचाळीस लाख रुपये किमतीचे ९३०ग्रॅम कोकेन जप्त केले .याप्रकरणी तीन जणांच्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले .यामध्ये एक कोस्टगार्ड कर्मचारी असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मोठ्या शहरांप्रमाणे आता कोकणातही अंमली पदार्थांची विक्री होत असल्याने अंमली पदार्थांच्या विळख्यात येथील तरुण वळत असल्याचे दिसून येत आहे .
याप्रकरणी पोलिसांनी दिनेश सिंह राहणार हरियाणा ,सुनील कुमार, नरेंद्र कुमार रनवा राहणार राजस्थान, व रामचंद्र मलिक राहणार हरियाणा या तिघांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे .यातील एक तरुण काेस्टकार्ड मध्ये नोकरीला असल्याचे कळते. रत्नागिरी जिल्ह्यात काही भागात अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचे पोलिसांना खबर मिळाली होती त्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई केली होती .परंतु यामध्ये आणखी काही लोकांचा समावेश असावा असा पोलिसांचा संशय होता. एमआयडीसी परिसरात कोकेनची विक्री होणार असल्याचे स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरीक्षक शिरीष सासणे यांना खबऱ्याने खबर दिली होती याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे याना सासणे यांनी दिली त्यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्यासह पोलिसांचे पथक तयार करून आरोपींवर पाळत ठेवली रात्रो ८वाजता हे तिघेजण एमआयडीसी परिसरात कोणाची तरी वाट पाहताना पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली व आरोपींना अटक करून त्यांच्याकडून पंचेचाळीस लाख रुपये किमतीचा कोकेन जप्त केला .एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोकेन जप्त होण्याची जिल्ह्यातील मोठी घटना आहे.
www.konkantoday.com