गणपती पुळे येथे समुद्रात बुडतांना तिघांना जीवरक्षकांनी वाचवले
रत्नागिरी जवळील गणपती पुळातल्या समुद्रात बुडताना तिघांना वाचवण्यात यश. हे तिघे पुण्याच्या दौंड तालुक्यातल्या पिंपळगावमधील राहणारे आहेत. पूजा कापरे, नंदकुमार कापरे आणि प्रदीप कापरे अशी तिघांची नावे आहेत. देवदर्शनसाठी ते गणपतीपुळ्यात आले होते.देवदर्शन झाल्यावर ते समुद्रात पोहण्यासाठी उतरले परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने ते समुद्रात बुडू लागले.ही गोष्ट किनाऱ्यावर असलेल्या जीवरक्षक अक्षय माने यांच्या लक्षात आले त्याने ग्रामस्थांच्या मदतीने या तिघांना समुद्रातून बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले.
www.konkantoday.com