अलिबागच्या अपमानाप्रकरणी ची याचिका हायकोर्टाने फेटाळली
काय रे अलिबागवरून अलायस का?या डायलॉग वर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे या डायलॉगमुळे अलिबागकरांचा अपमान होत असल्याची भावना होती त्याविरोधात अलिबागमधील सातीजै गावचे रहिवासी राजेंद्र ठाकूर यांनी अॅड रघुराज देशपांडे यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली होती असे विनोद सर्व समुदायाच्या लोकांवर होत असतात ते फारसे मनावर घ्यायचे नसतात असे नमूद करत हायकोर्टाने ही याचिका फेटाळली.
www.konkantoday.com